महाग्रामीन नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संखेने सामील होण्याचे अवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 9 जून 2024

महाग्रामीन नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संखेने सामील होण्याचे अवाहन.

 



वालुर दि.09/06/2024. (तेज़्ज़न्युज़24) संपादक.अनवर पठान तडवी. 

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वालुर  यांच्यातर्फे  सर्व  शेतकरी वर्गाला पिक कर्ज नुतनीकरण व्याज परतावा तसेच शासनाच्या  पिक  कर्ज नुतनीकरण ,व्याज परतावा तसेच शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचे महत्व पटवून सांगण्यासाठी व त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी महाग्रामीन नवचेतना  संवाद यात्रेचे दि .०५ जुन ते १५ जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे . संपूर्ण मराठवाड्यात तब्बल ५० ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार असून यादरम्यान तब्बल २००० नियमित पिक कर्ज धारकांचा सत्कार तसेच संपूर्ण यात्रेदरम्यान २००० झाडांचे वृक्षारोपण देखील बँकेमार्फत करण्यात येणार आहे. सदर यात्रा जिल्हा परभणी येथील पाथरी तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रेणांखळी येथे १० जून सोमवार रोजी सकाळी ११ वाजता येणार आहे.

सदर यात्रा हि येत्या 5 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरु होऊन २ वेगवेगळ्या मार्गांनी नांदेड या ठिकाणी एकत्र येणार असून १५ तारखेला नांदेड ला समारोपन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एक टीम छत्रपती संभाजीनगर,बीड,धाराशिव,लातूर ते नांदेड या मार्गाने मार्गक्रम करणार असून त्या दरम्यान ए.टी.एम मशीन चे प्रात्यक्षिक तसेच आर्थिक समावेश, डिजिटल साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती करण्याचे काम देखील बँकेमार्फत करण्यात येणार आहे. बँकेचे ग्राहक, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, बचत गटातील महिलावर्ग तसेच संबंधित शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आपापल्या गावात येणाऱ्या महाग्रामीन नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संखेने सामील होण्याचे व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड तसेच  सर्व बँक शाखेचे व्यवस्थापक  अधिकारी कर्मचारी  यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें