वालुर येथील राजाराम सिरसाठ यांना जिल्हाधिकारी कार्यालय समोर अत्मदहनाचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 21 मई 2024

वालुर येथील राजाराम सिरसाठ यांना जिल्हाधिकारी कार्यालय समोर अत्मदहनाचा इशारा.

 


प्रतिनिधी,वालुर दि.20/05/2024.


वालुर ता.सेलु जि.परभणी  येथील सरकारी गोठान व स.हसन साहेब दर्गा मोक्याच्या ठिकाणी जागेवर खाजगी लोकांनी अतिक्रमण करुन तेथे पक्के बांधकाम करत असल्याने फेब्रुवारी महिन्यात राजाराम आनंदा सिरसाठ व सहकारी यांनी तब्बल सहा दिवस उपोषण केले होते . 

संबधीत सरकारी जमीन डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व सांस्कृतिक क्रिडा संकुलाच्यासाठि राखिल करुन तेथे होणारे अतिक्रमण थांबवण्याची त्यांची मागणी होती परंतु तीन महिने उलटुन हि व सर्व प्रकारचा पाठपुरावा करुन हि कोनतिहि कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी विभागीय आयुक्तांकडे हि एक दिवस उपोषण केलेला होता तरिहि कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी दि.20/05/2024 रोजी उपजिल्हाधिकारी सेलु मार्फत एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी परभणी यांना आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समोर अत्मदहनाचा इशारा दिला आहे.


प्रतिक्रिया.

आम्हि गेल्या तीन महिन्यांपासून शासकिय ज़मीन वाचविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढाई लढत आहोत परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अत्मदहन करणार असुन सर्व परिणामाला जिल्हा व तालुका प्रशासन जबाबदार राहिल.


राजाराम आनंदा सिरसाठ.

सामाजिक कार्यकर्ता वालुर.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें