संपादकीय, अनवर पठाण तडवी, #tezznews24
भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी व मिसाईलचे जनक , इंग्रजांना कडि झुंज देणारे शेर ए म्हैसूर हज़रत टिपु सुल्तान यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सेलु येथील ह. टिपु सुल्तान मित्र मंडळ यांनी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन जयंती साजरी केली, काल दि. 29/11/2024 रोजी हिजामा कॅंप आयोजित केले तसेच गरीब गरजु महिलांना रेशन किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यात प्रमुख पाहुणे म्हणून सेलु येथील कार्यरत पीआय बोरले साहेब यांच्या उपस्थितीत राशन किट वाटप करण्यात आली.
तसेच आज दि. 30नोव्हेंबर रोजी फातिमा प्रायमरी शाळेत गरजु विद्यार्थ्यांनां स्कुल बॅग वाटप करण्यात आले तसेच जवळपास 80 विद्यार्थ्यांनां वही पेन टिफिन डब्बा व पाणी बाटल वाटप करण्यात आले. या वेळी इरफान पठाण, शेख आशु शेख बाबु, सय्यद इब्राहिम, समीर शेख, शेख अली शेख बाबु, परवेझ पठान आदींनी परिश्रम घेऊन सर्व उपक्रम यशस्वी केले..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें