सेलु येथील प्रारुप मतदार यादित फोटो सहित यादि प्रसिद्ध करण्याची मागनी..
संपादनकिय (अनवर पठाण तडवी) तेज़्ज़न्युज़ 24 वेब चॅनल .दि.14/10/2025.
नगरपालिका निवडणुक 2025 च्या अनुषंगाने राज्य निवडणुक आयोगाने जे याद्या प्रसिद्ध केले आहे त्यात सेलु न.प.प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केले त्यात मतदारांचे फोटो नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी त्रास होत असुन याच न.प. निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील जिंतुर येथील प्रारुप मतदार यादित फोटो सहित नावे आहे . जिल्ह्यातील एका तालुक्याल एक व दुसऱ्याला दुसरे नियम हा दुजा भाव असल्याची खंत व्यक्त करत सेलु जि.परभणी येथील माजी नगरसेवक शेख रहिम शेख गुलाब यांनी दि.14/10/2025 रोजी सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा मुख्याधिकारी न.प.सेलु यांना निवेदन देऊन प्रारुप मतदार याद्यात फोटो सहित प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें