प्रतिनिधी दि.22/05/2025
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर येथील जि.प.प्रा.शाळा ऊर्दू माध्यमला जोडुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन नववा वर्ग चालु करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती यांनी दि.22/05/2025 रोजी शिक्षण विभाग जि.प.परभणी यांना केली आहे.
उपरोक्त असे कि वालुर येथे मुस्लिम समाजाची संख्या हि जास्त प्रमाणात असुन येथे ऊर्दु माध्यमाची एक खाजगी व जि.प.ची सरकारी शाळा आहे परंतु दोन्ही शाळेत प्राथमिक शिक्षणाची सुविधा असल्याने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची हे पुढिल शिक्षणासाठि परगावी जात आहे यातील बहुतेक विद्यार्थी हे गरीब असल्याने ते पुढिल शिक्षणापासुन वंचित राहत आहे .
या प्रकरणी वालुर येथील अल्पसंख्यांक पालकवर्ग हे मागील कित्येक वर्षांपासुन पुढिल वर्गाची मागणी करत आहे परंतु ती मान्य होत नसल्याची खंत आहे .
त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व विशेष करुन ग्रामपंचायत सदस्य सय्यद जलाल सय्यद अमीन यांनी या वर्षी पुढाकार घेऊन दि.22/05/2025 रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन दिले असुन निवेदनावर शा.व.स.अध्यक आफरोज़ खान फेरोज़खान पठाण व सर्व सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें