प्रतिनिधी दि.12/07/2024.
सेलु जिल्हा परभणी येथील इस.सन डिसेंबर 2023 पासुन ते आजतागायतचे नवीन नोंदणीचे व नुतनीकरणाचे अर्ज प्रलंबित असल्याने बांधकाम कामगार हे कल्याणकारी योजना पासुन वंचित राहत असुन यापुर्वी आम्ही आपले सरकार पोर्टलवर वारंवार तक्रार केली परंतु अद्याप हि सेलु तालुक्यातील अर्ज प्रलंबित आहेत.
लोकसभेची आचार संहिता संपुन एक महिना उलटुन ही सेलु तालुक्यातील बांधकाम कामगार यांचे नवीन नोंदणीचे व नुतनीकरणाचे अर्ज प्रलंबित असल्याने व थोड्याच दिवसात पुन्हा महाराष्ट्र विधानसभेची आचार संहिता लागण्याची शक्यता असताना आपन फक्त सेलु तालुक्यातील अर्ज प्रलंबित ठेवले असल्याने जुने नोंदणी बांधकाम कामगार यांना शालेय योजनांचे अर्ज व विविध कल्याणकारी योजना अर्ज सादर करता येत नाहि कारण नुतणीकरण नसल्यास कोनतेच लाभ भेटत नाहि व तसेच नवीन नोंदणीचे अर्ज प्रलंबित असल्याने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेपासुन वंचित राहत असल्याने या प्रकरणी आपन दखल घेऊन शिघ्र तितक्या तातडीने सेलु तालुक्यातील सर्व अर्ज निकाली न काढल्यास युवा विचार मंच संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयास कुलुप ठोकण्याचा इशारा आज दि.12/07/2024 रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालय परभणी यांना देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनवर दिलावर पठान तडवी, राजाराम आनंदा सिरसाठ व जुबेर खान मन्सुरखान पठान आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें