प्रतिनिधी, वालुर दि. 08/02/2025.
वालुर ता. सेलु जि. परभणी येथे दि. 06/02/2025 रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आदिवासी कुटुंबाच्या महिलांना घरात घुसून लाथा बुक्यांनी मारहाण केली व जातीयवादक शिविगाळ केल्या प्रकरणी दि. 08/02/2025 रोजी नसरीन पि. दिलावर पठान तडवी यांच्या फिर्यादीवरुन गुन रजी. नं.68/2025 ,बिएनएस2023 कलम 74, कलम 333, कलम 189(2), कलम 191(2) , कलम 190 सहकलम अनुसुचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 प्रमाने रहिमखॉं रशीद खाॅं पठान, सलीम खाॕं हबीब खाॕं पठान, रशीद खाॅं हबीब खाॅं पठान, शारुख खाॅं सलीम खाॅं पठान, फेरोज सलीम खाॅं पठान, सर्व राहणार वालुर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी सेलु म्हणुन पदभार असलेले जिवन बेनिमाल हे पुढिल तपास करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें