प्रतिनिधी/परतूर दि.14/09/2022.
परतूर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे,पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या परतूर नगर पालिकेच्या कोंडवाड्यात अपुऱ्या सोयीमुळे गुरांची आबाळ होत असल्याचे चित्र आहे. कोंडवाड्यातील पत्रे फुटलेल्या अवस्थेत असून त्याठिकाणी पावसाच्या पाण्याचीधार लागत आहे यामुळे खाली पाणी साचत आहे, साचलेल्या पाण्यामुळे कोंडवड्याला गटाराचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे गुरांना बसण्यासाठी देखिल जागा शिल्लक नसून सदरील गुरांना दिवस - रात्र ताटकळत काढावी लागत आहे.
त्या ठिकाणची पाहणी केली असता कोंडवड्याची नित्यनियामने साफ सफाई देखील केली जात नसल्याचे चित्र आढळून आले. नगर परिषदेकडून मुक्या जनावरांचे छळ कधी थांबणार ? जिवंत जनावरांचे बेहाल करून मरणाच्या वाटेवर आणून सोडणाऱ्या कोंडवाडा निरीक्षकांच्या कामकाजावर मुख्याधिकारी लक्ष कधी देणार? नगर परिषद फक्त मोकाट जनावरे पकडुन जनावर मालकांकडून दंड स्वरूपात रक्कमच वसूल करणार, तर मग त्या जनावरांना सुविधा कोण पुरवणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संदर्भात अनेक तक्रारी देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें