वालूर ग्रामपंचायत वर धडकला विरोधक व नागरिकांचा यलगार मोर्चा । - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 सितंबर 2022

वालूर ग्रामपंचायत वर धडकला विरोधक व नागरिकांचा यलगार मोर्चा ।

नागरिक सुविधा पुरवण्यास ग्रामपंचायत असमर्थ.


आमचे सरपंच कामच करत नाही 

असा अनेकांचा घनाघाती आरोप.



संपाद.अनवर पठान. दि.140/9/2022.

मोर्चामध्ये विरोधी गटाचे सहा सदस्य शामिल माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान चेअरमन गोरख भालेराव यांच्या नेतृत्वात आज बुधवार रोजी वालूर ग्रामपंचायतीवर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शिवाजी चौक वालूर येथून मोर्चा काढण्यात आला  मोर्चामध्ये घोषणाबाजी करत महिलासह शेकडो नागरिक उपस्थित होते यावेळी वालूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि यावेळी वालूर ग्रामपंचायतीच्या अनागोदी कारभाराविषयी नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला तर या मोर्चाचे नेतृत्व करत असलेले गोरख भालेराव यांनी वालूरच्या सरपंचावर मनमानी कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप केला सरपंच हे कामच करत नसून यांनी मतदान दिले त्यांनी नाही त्यानी  दिले नाही असे भेदभाव करत सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करत असल्याचे टीका यावेळी माझी उपसभापती तथा विद्यमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोरख  भालेराव यांनी सरपंच संजय साडेगावकर यांच्यावर टीका केली तर दुसरीकडे वार्ड क्रमांक 2 आणि 3 येथील विरोधी गटाचे सदस्य लिंबाजी कलाल आणि वाहेदखाॅ  पठाण यांनीही सरपंचाच्या मनमानी कारभाराला आम्ही कंटाळलो असून आता यापुढे नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी आणि आम्ही मोर्चाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विरोधात रान उठून येथील मनमानी कारभाराला आळा बसवु तसेच आम्ही विरोधी गटाचे सदस्य निवडून आलेल्या वार्डात सत्ताधारी भेदभाव करत असून येथील नागरिकांना नाहक वेठीस धरण्याचा प्रकार वालूर ग्रामपंचायतीकडुन चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल नाल्यांचा प्रश्न असेल तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल गावातील विविध विकास कामांचा प्रश्न असेल आम्ही वालूर विकास आघाडीचे विरोधी गटाचे सर्व सदस्यांनी वेळोवेळी आमसभा असेल ग्रामसभा असेल तसेच ग्रामसेवक असेल पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी आमच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या मांडलेला आहे परंतु वालूर येथील सत्ताधारी गट आणि येथील सरपंच संजय साडेगावकर हे आपली मनमानी करत विरोधी गटाच्या सदस्यातील वार्डात कामे न करता नागरिकांना वेठीस धरीत आहे आणि त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून पावसाळ्यातील पावसाचे पाणीही अनेक ठिकाणी तुंबून लोकांच्या घरात शिरत आहे यामुळे डेंगू मलेरिया सारख्या आजारांना निमंत्रण भेटत आहे तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे झाल्याने ये जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शाळेतील विद्यार्थी असतील वयोवृद्ध असतील यांना तर रस्त्याहून चालणे देखील कठीण झाले आहे तर मोटरसायकल चालकांनाही कसरत करत आपली वाहने चालवावी लागते असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले असताना आणि लाखोंचा निधी वालूर ग्रामपंचायत मध्ये  शिल्लक असताना वालूरचे सरपंच आणि सत्ताधारी हे आपला मनमानी कारभार करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी निवडणुकीत लीड नाही भेटली त्या वार्डातील लोकांवर भेदभाव करत अन्याय करत आहे तसेच वारंवार निवेदने देऊन सूचना करूनही या नागरिकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे यावेळी वालूर विकास आघाडीचे विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कलाल, धारूजी धाबे, सतीश कलाल ,चौधरी सायरबी पठाण, राबियाबी कुरेशी, आदी आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहे तर गोरख माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान चेअरमन गोरखजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन आज बुधवार दिनांक .14 /9 /2022 रोजी करण्यात आले या मोर्चाला वालीतील शिवाजी चौक येथून सुरुवात झाली असून मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने वालूर येथील नागरिकांची उपस्थिती होती यावेळी ग्रामपंचायतच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवाजी चौक येथून आज सकाळी 11 वाजता मोर्चा निघाला असून ग्रामपंचायत येथील मैदानात मोर्चा धडकला यावेळी अनेक महिलांनी आणि नागरिकांनी आपल्या समस्या यावेळी बोलून दाखवल्या तर 


*या मोर्चासाठी कडेकोट पोलीस  बंदोबस्तीही ठेवण्यात आला होता यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक श्री संजय चव्हाण,

वालूर येथील बीट जमादार शेख गौस,

जमादार एम .एम. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल एम. एस .बुधवंत, श्री संजय सानप ,कैलास निंबाळकर, आदींची यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थिती हो*


या मोर्चामध्ये माजिद भाई मिस्तरी, सरताज ,भाई मिस्तरी ,विष्णू कलाल, दत्ता सरगर, शिवाजी जीवने ,शेख पाशा ,युसुफ कुरेशी ,उस्मान पठाण, कट्टू पाचगे ,बबलू पठाण ,अशोक पाचगे, मस्तान भाई, प्रभाकर कलाल ,मकसूद कुरेशी जावेद ,मिस्तरी ,मारुती चोरमले, अशोक शिरसाट, गजानन चोरमले नजीर मिस्तरी ,खाजा मिस्तरी,

अमु कुरेशी, रोया वाटुरे,आदिचा सहभाग होता 



यावेळी या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी वालूर येथील 

ग्रामविकास अधिकारी सी .एन. कुवर, हे उपस्थित होते या निवेदनावर मारुती हरकळ, ओम वावरे ,शेख अमजद, अंजाराम तुरुंकझाडे, माणिक पांजगे, संतोष पांचगे, विजय पांचगे, विष्णु शिंदे, सय्यद मास्तान, गजानन रोकडे, वाहेद कुरेशी, वाजेत कुरेशी, शेख उस्मान, रोहिदास मैनाजी ,यमुनाबाई, सुनील, रोशनखा ,त्रिंबक आप्पाराव, सखुबाई पांचगे ,हरीभाई पांचगे, रोहिदास भीमराव, किसनाबाई आनंदराव शिरसाठ, निलाबाई शंकरराव पांढरे,

 लक्ष्मी  पांढरे, सोजराबाई सावंत, अंजनाबाई गायकवाड, मंगल रामचंद्र जाधव, चव्हाण कलाबाई शंकर सोनवणे, गंगुबाई गायकवाड ,सखुबाई नाथा वायदंडे, सावंत सरुबाई वाटुरे मिनाबाई वाटोळे, प्रल्हाद राऊत, शकील कुरेशी, संतराम कटारे, नईम , नसीम पठाण, जावेद पठाण अमोल वाटुरे, विनोद कलाल, फिरोज पठाण, विनोद गायकवाड, परमेश्वर वाघमोडे, शिवाजी जीवने, आदींची या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या


सी .एन. कुवर ग्रामविकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारताना वालूर येथील रखडलेली कामे पुढील काही दिवसातच सुरुवात करू आणि उपलब्ध निधी नुसार याचा संपूर्ण वार्डामध्ये खर्च करण्यात येईल आणि नागरिकांची कामे पुढील काही दिवसात सुरू करून नागरिकांची होत असलेली हेडसांड दूर करण्यात येईल आणि वार्ड क्रमांक 1 मधील बंद पडलेल्या रस्त्याचे काम पुढील आठ दिवसात नियोजन करून रेती उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच घरकुलांचा प्रश्न असेल हाही पुढील सभेत ठराव घेऊन सोडवण्यात येईल वालूर येथे 1055 घरकुले मंजुरीसाठी आपल्याकडे नावे आलेली आहे तसेच रस्ते पाणी स्वच्छता नाल्यांचा प्रश्न पुढील काही दिवसात सोडविण्यात येईल असे यावेळी ग्रामविकास अधिकारी सी. एन .कुवर यांनी उपस्थित आंदोलन  यावेळी आश्वासन धिले आणी आदोलन कृत्याचे  निवेदन  सवीकारले त्यांच्या समवेत गणेश मुंडे हेही उपस्थित होते तरी या संपूर्ण प्रकरणांमध्ये सरपंच संजय साळेगावकर यांची अनुपस्थिती जाणवत होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें