वालुर येथे कब्रस्तान भिंतीच्या कामाचे भुमिपुजन झाले दोन वेळेस पाटि बदलली परंतु माहिती दर्शक पाटि गायब .
प्रतिनिधी.दि.09/09/2022.
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या विशेष करुन अल्पसंख्याक बहुल गाव असलेल्या वालुर येथे मागील महिन्यात मोठा गाजावाजा करून अल्पसंख्याक समाजाच्या कब्रस्थान संरक्षण भिंतींचे भुमिपुजन करण्यात आले एक नामफलक हि रोवण्यात आले असुन त्यावर माजी आमदार,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सभापती,माजी पंचायत समिती उपसभापती,वालुर येथील विद्यमान सरपंच , उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष,रा.कॉ.पा.सेलु तालुकाध्यक्ष व कंत्राटदाराचे नाव आहे परंतु ते काम नेमका कोनत्या योजने अंतर्गत होत आहे ? कोनत्या विभागातुन होत आहे ? कामाचे नाव ? प्रशासकीय मान्यता ? तांत्रिक मान्यता ? कार्यारंभ आदेश ? कामाची किम्मत ? काम सुरु करण्याची तारिक ? दोष निवारण कालावधी इ. ची माहिती असलेले माहिती फलक ठळक मोकळ्या जागी लावण्याचे शासन निर्णय असताना लावले नसल्याने फक्त निवडणुका जवळ आल्या असल्याने एक मोठा चॉकलेट तर नाहि ना अशी चर्चा अल्पसंख्याक समाजाच्या वतीने केली जात आहे..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें