जिंतुर सेलु (पाचलेगाव)रस्ता नियम बाह्य होत असल्याने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे उपोषणाचा इशारा . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 अगस्त 2022

जिंतुर सेलु (पाचलेगाव)रस्ता नियम बाह्य होत असल्याने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे उपोषणाचा इशारा .

 


प्रतिनिधी.अनवर पठाण.वालुर.) दि.07/08/2022.

जिंतुर सेलु या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता,रस्ते विकास योजना २००१-२१अनुसार प्र.रा.मा २ ते पाचेगाव,निवळी,धारुर,राजेवाडि ते रा.मा.२५३ रस्ता प्र.जि.मा.३० कि.मी ३० कि.मी.०/०० ते ३०/०० यांचे काम प्रगतीपथावर चालु असुन कि.मी.०/०० ते ०/१५ हि लांबी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिंतुरच्या अखत्यारीत येते तर कि.मी. १५/०० ते ३०/०० हि लांबी सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलु कार्यालयाच्या अखत्यारीत येते असुन याची रुंदी २४ मिटर इतकि असुन ROW भारतीय रस्ते संहिता प्रमाणे रस्त्याच्या कामात २४ मीटर पैकि रस्त्याच्या मध्यभागापासुन एकिकडे १२ मिटर व दुसरीकडे १२ मिटर प्रमाणे काम नियमाप्रमाणे अपेक्षित असताना धावपट्टी वळुन साईट पट्टि (पक्का) मुरुम रस्ता हा एकिकडे ३ मिटर व दुसरीकडे ३ करणे अपेक्षित असताना या रस्त्यावर कंत्राटदार (ठेकेदारांने) धावपट्टी वगळुन साईट रस्ता हा कुठे एक मिटर तर कुठे त्याहि पेक्षा कमी केल्याने भविष्यात या मार्गावर अपघात होण्यास मार्ग मोकळा ठेवला आहे.

   तसेच याच मार्गावरील सय्यद आलम शहिद दर्गा जवळील  रस्त्यातील भाग कि.मी. 25+550 ते कि.मी.25+750 तील खाजगी अतिक्रमण न तोडता रस्ताच वळन देऊन धोकादायक वळण निर्माण झाला केला आहे. संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग.शासन निर्णय क्रं.आरबीडी - १०८१/८७१/रस्ते-७ दि.09 मार्च 2001.  मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ , महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६९ भारतीय रस्ते संहिता "इमारत रेषा"  नियमाप्रमाणे सेंटर पासुन १५मि. एक दिशेला व १५ मि.दुसऱ्या दिशेला पक्के बांधकाम करण्याचे नियम असताना या ठिकाणी धापपट्टिच्या एक मिटर हि पेक्षा कमी अंतरावर पक्के बांधकाम असल्याने अनवधानाच्या वेळी चालकाने गाडि साईडला लावण्याजी जागाच राहिलेली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी सर्व नियम धाब्यावर ठेऊन नियम बाह्य काम केले असल्याचे निष्पन्न होत आहे. या प्रकरणी युवा विचार मंच महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अनवर पठान व प्रदेशाध्यक्ष, पठाण करिमखान यांनी एका निवेदनाद्वारे दि.14 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद यांच्या दालनात उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें