संपादक,अनवर पठान. (तेज़्ज़न्युज़24) दि.२९/०७/२०२२.
वालूर बस स्थानक परीसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठा खडडा दुरुस्ती करणे बाबत व पुढील एक आठवडयात काम पुर्ण न झाल्यास वालूर ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचा इशारा.
वालूर येथील बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर सात फुट रुंदीचा एक मोठा खड्डा पडलेला आहे . या पडलेल्या खडयामुळे महाराष्ट्र शासनाची एस.टी. बस वळविण्यास आडथळा निर्माण होत असून या खडडयामुळे बस चा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . या मुळे मागील चार ते सहा महिण्यापासून एस.टी. बस गावात न येता गावा बाहेरुनच परत जात आहे . यामुळे विद्यार्थी व नागरीकांना त्रास होत आहे . वालूर ग्राम पंचायत कडून हा खडडा बुजविण्यात येईल आसे तोंडी आश्वासन देण्यात आले होते . परंतू दिड महिना होउन सुध्दा हे काम न झाल्यामुळे एका निवेदनाद्वारे दि.२७/०७/२०२२ रोजी बालाजी वाल्मीक हरकळ यांनी दिनांक ०५/०८/२०२२ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक ११:३० वाजता वालूर ग्रामपंचयतचे ग्रामसेवक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें