वालुर येथील अंगणवाडी समोर घाणीचे साम्राज्य ! स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 जुलाई 2022

वालुर येथील अंगणवाडी समोर घाणीचे साम्राज्य ! स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष.

 


प्रतिनिधी.वालुर(अनवर पठान) दि.27/07/2022.

बालकांना शिक्षणाचे संस्कार देण्याचे दालन म्हणुन अंगणवाडीकडे पाहिले जाते परंतु सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर येथील वार्ड क्रं.1 मधील अंगणवाडी क्रं.10 च्या मुख्य द्वारा समोर घाणीचे साम्राज्य झाले असुन एकिकडे शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सर्वांना पोषण आहार व शिक्षणाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी या हेतुने प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात सुदृढ निरोगी होण्यासाठी व शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून विविध उपक्रम राबविण्यात येते परंतु अंगणवाडी समोरच घाणीचे साम्राज्य झाले असल्याने बाळांना आरोग्य संरक्षण कसे मिळेल असा प्रश्न निर्माण होत आहे. पोषण आहार घेण्यासाठी येणारे बालक याच घाणीच्या सानिध्यात बसुन पोषण आहार घेत असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तसे प्रत्येक महिन्याला बालकांचे वजन करण्या करिता येणारे पालक हि या घाणीमुळे त्र्यस्त झाले आहे . ग्रामपंचायत वालुरने या प्रकरणी लक्ष देऊन तेथील साचलेली घाण साफ करून त्या ठिकाणी मुरुम टाकण्याची मागणी परिसरातील पालक वर्गाकडुन केली जात आहे..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें