वालुर ग्रामपंचायतला पडला सनासुदिचा विसर ! हतबल ग्रामपंचायत झोपलेले लोकप्रतिनिधी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 जुलाई 2022

वालुर ग्रामपंचायतला पडला सनासुदिचा विसर ! हतबल ग्रामपंचायत झोपलेले लोकप्रतिनिधी .

 आता ईदच्या नमाज़ीला जायचे कसे ?



वालुर प्रतिनिधी .अनवर पठान. दि.09/07/2022.

मुस्लीम समाजाचा ईद उल अज़्हा (बकर ईद) उद्या दि.10 जुलै रोजी साजरी होणार असुन या दिवशी मुस्लीम बांधव एका जागी उपस्थित होऊन सामुदायिकरित्या नमाज़ अदा करतात ती नमाज़ एका विशिष्ट जागी पढन केली जाते त्यास ईद गाह असे म्हणतात.

सेलु तालुक्यातील सर्वात मोठे व विशेष करुन मुस्लीम बहुल असलेल्या गावात असलेल्या वालुर या गावात ईदची नमाज़ हि गावातील ईदगाह येथे पढन केली जात असुन सध्य स्थीतीला ईदगाहला जाण्यासाठि रस्ता आहे परंतु ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे येथे मोठे मोठे ढव साचले आहे‌. 

कोरोना म्हामारीच्या प्रकोपान मागील दोन वर्षांपासुन ईदगाह मैदानावर ईदची नमाज़ अदा करण्यात आली नव्हती या वर्षी रमज़ान ईद व आता बकरी ईदची नमाज़ येथे पढन करण्यात येणार आहे परंतु जायला रस्ताच नाहि सध्य स्थीतीला ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारीचे दोन मुस्लीम सदस्य आहेत व विरोधकांचे दोन परंतु हे चारहि या प्रकरणी मुगगिळुन गप्प आहेत.विद्यमान सरपंच व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांचे पुत्र हे फक्त ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाला गळाभेट करुन शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित आहे. अता जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागलेली असताना आजी माजी व भावी फक्त उद्या शुभेच्छा देण्यापुरते परंतु उद्या मुस्लीम बांधव नमाज़ला कसे जातेन या विषयी एक हि बोलायला किंवा कार्य करायला तय्यार नाहि . बहुदा अता बातमी प्रकाशित झाल्यावर मुरुम टाकुन तात्पुरती व्यवस्था करतेन अशी चर्चा मुस्लिम समाजाच्या वतिने केली जात आहे‌‌..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें