वालुर प्रतिनिधी दि.25/06/2022.
जिंतुर सेलु या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता प्र.रा.मा.2 ते पाचलेगाव,निवडि,वालुर, राजेवाडी ते राज्य मार्ग रा.मा.253 रस्ता प्र.जि.मा.30किमी याचे काम प्रगतीपथावर चालु असुन सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलु कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या वालुर ते सेलु मार्गावरील सय्यद आलम शहिद दर्गा जवळील रस्ता हा नियमबाह्य होत असल्याची सा.बा विभागात वेळोवेळी तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध माध्यमातुन देण्यात आली परंतु संबंधीत सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलुने याकडे वारंवार दुर्लक्ष केले असताना आता त्याच अतिक्रमणीत पक्क्या बांधकामाने रोडच्या साईडला होत असलेल्या नालीला मोठा अर्थळा निर्माण केला असुन सध्या पावसाळा चालु असल्याने रोडच्या कडेवरील शेतातील व वढ्यातील पाणी रोड उंच असल्यामुळे शेतात जाऊन शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान होऊ नये म्हणुन सा.बां.विभागामार्फत साईड नाली टाकायचे काम चालु असताना संबंधीताच्या बांधकामामुळे ती नालीचे काम अर्धवट सोडुन सा.बां.विभागाने तेथेच थांबली आहे . तेथील अतिक्रमण तोडुन त्या नालीचे काम पुर्ण होणार कि सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्वी प्रमाणेच नवीन शक्कल लढवणार अशी चर्चा सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें