सेलू नगर परिषद ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे दिवास्वप्न आघाडी धर्म न पाळता एकला चलो रे चा नारा यशस्वी होणार का? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 7 जून 2022

सेलू नगर परिषद ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे दिवास्वप्न आघाडी धर्म न पाळता एकला चलो रे चा नारा यशस्वी होणार का?

 



सेलू प्रतिनिधी.दि.07/06/2022.


परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत मात्र सेलूतील नगरपरिषद येत्या काळात ताब्यात घेण्यात येईल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार विजय भांबळे यांनी व्यक्त केला. मात्र सेलू नगर पालिका ताब्यात घेण्याचे त्यांचे दिवास्वप्न ठरेल का? असेच वाटते.

          गेल्या अनेक दिवसापासून सेलू नगरपरिषद वर आपले वर्चस्व स्थापन करण्याकरिता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे . त्यात सेलू तालुक्यात या पूर्वीपासूनच भारतीय काँग्रेस आणि मधील काही काळ शिवसेनेचे प्राबल्य  होते. मात्र आता तेही विरुन गेलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील आघाड्यांचे तंत्र वापरले जात आहे कुण्या एका पक्षाला एक हाती सत्ता घेणे शक्य होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन मोठ्या पक्षांसह अन्य काही छोट्या छोट्या पक्षांना एकत्र येऊन आघाडी सरकार बनवले जात आहे.

त्यातही सेलू शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला अगदीच बोटावर मोजण्या सारखे यश आजवर मिळालेले आहे. आणि यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा गडी नवा राज्"चा फार्मूला तयार करून"नवी आशा नवी दिशा"या नवीन म्हणीनुसार परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांना समोर करून आता सेलू नगरपालिका ताब्यात घेण्याचे दिवास्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पहात आहे. सेलू शहर आजवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने होते मात्र सर्वत्र आघाडी असताना व सध्या सेलु नगर परिषदेत शिवसेना आणि भारतीय काँग्रेस यांचे मताधिक्य तुल्यबळ आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस नावालाच आहे तरीही शिवसेना आणि काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस आपले घोडे पुढे करून सत्ता स्थापन करून नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करेल का? असे वाटते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस तसा  प्रयत्न गेल्या सहा महिन्यापासून करत असल्याचे चित्र दिसत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सहा जून सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केशवराज बाबासाहेब मंदिरात तसेच शनिवार बाजार भागातील शहाबुद्दिन दर्गा येथे ब्राह्मण आणि मुस्लिम समाजाला समोर ठेवून आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच येथील साई नाट्यमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आयोजित केला होता. व या करिता गेल्या पंधरा दिवसापासून राष्ट्रवादीच्या वतीने तयारी करण्यात येत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दौरा शासनाच्या वतीने देखील जाहीर करण्यात आला मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांची तब्येत खराब असल्याकारणाने ते सेलू येथे येऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्ये थोडीशी नाराजी दिसून आली मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता खासदार फौजिया खान माजी खासदार सुरेश जाधव आमदार बाबाजानी दुर्रानी तसेच माजी आमदार विजय भांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सेलू नगर परिषद ताब्यात घेण्याचे मोठे सूतोवाच केले . नगर परिषद ताब्यात घेण्याकरिता यापूर्वीच टपून बसलेले शिवसेना भारतीय काँग्रेस तसेच स्थानिक आघाडी यांचे प्राबल्य विसरून चालणार नाही शिवाय भारतीय जनता पक्ष एक आव्हान उभे करणार आहे हेही तेवढेच खरे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें