विभागीय आयुक्त यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले बारवांचे सौंदर्य ।
प्रतिनिधी वालुर दि.10/06/2022.
आज दि.10 जुन रोजी सेलु तालुक्यातील ऐतिहासिक बारवानां विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रे साहेब यांनी भेट दिली असुन यातील भगवान बाबा नगरातील श्री माणकेश्वर मंदिर जवळील बारव चा काम युवाकांच्या श्रमदानाने दि.17 मे रोजीच स्वच्छ केलेली असुन बारव गल्लीतील बारव स्वच्छ तेचे काम प्रगतीपथावर चालु असुन सोशल मिडिया व विविध माध्यमातुन यां दोन्ही बारवांचे सौंदर्य प्रसारित झाल्या नंतर वालुर येथील पुरातन काळातील ऐतिहासिक बारवांचे सौंदर्य पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी भेट देत आहेत.
वालुर येथील बारवांच्या भेटि वेळी आयुक्त साहेब हे म्हणाले कि हे बारव म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच परंतु भविष्यात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी उपयोगी येणारे मोठे स्त्रोत आहे .तसेच जी चुक मागच्या पिढिने केली ते न करता या बारवांना संरक्षित करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन यापुढे या बारवांत घाण टाकु देऊ नये. या बारवांत पाणी साठा करण्यासाठी भविष्यात बोअर घेऊन त्या पाण्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.
या वेळी अंचल गोयल जिल्हाधिकारी परभणी, अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी सेलु, दिनेश झाम्पले तहसिलदार सेलु, प्रशांत थारकर नायब तहसीलदार सेलु , पराचे तलाठि सज्जा वालुर,श्रमदान करणारे युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें