प्रतिनिधी.वालुर.दि.24/06/2022.
सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर येथे महावितरणचे 33 केव्ही उपकेंद्र असुन या ठिकाणी माळी गल्ली येथील विद्युत रोहित्र मागील तीन दिवसांपासून जळाले असल्याने माळी गल्ली,कुरेशी गल्ली,रोनपुरा मोहल्ला,बारव गल्ली येथील जनतेला मागील तीन दिवसांपासून अंधारात रहावे लागत असुन या भागातील रोहित्र जळाल्याने पिठाच्या गिरण्या बंद पडल्या असल्याने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . तीन दिवसांपासून जळालेली डिपी महावितरणने बसवीली नसल्याने महावितरणचे गलथान कारभार चव्हाट्यावर आले आहे. महावितरणने तात्काळ जळालेले रोहित्र बसवावे मागणी नागरिकांकडुन केली जात आहे..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें