अवैध वाहनांमुळे त्रस्त वालुरातील ग्रामस्थ करणार उपोषण ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 25 जून 2022

अवैध वाहनांमुळे त्रस्त वालुरातील ग्रामस्थ करणार उपोषण !



प्रतिनिधी,वालुर दि.22/06/2022.

वालूर येथील बसस्थानक परिसरात उभे राहणारे अवैद्य वाहनामुळे महाराष्ट्र शासनाची एस.टी.बस बसस्थानकात येणे बंद झाले असून या अवैद्य वाहतुकदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्याथा दिनांक २५/०६/२०२२ रोजी वालूर येथे बसस्थानकात एक दिवसीय अमरण उपोषण करण्यात येईल .

वालूर ही सेलू तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे . वालूर येथे मोठया प्रमाणात विदयार्थी , जेष्ठ नागरीक रुग्न.एस.टी . बसने दररोज हजारोच्या संखेने प्रवास करतात परंतु मागील काही दिवसापासून वालूर येथे बसस्थानकात अवैद्य वाहने उभे टाकत असल्याने एस.टी.बस ला वळण घेण्यास पुरेशी जागा मिळत नाही यामुळे पाथरी आगारातून सेलू - वालूर येणा - या एस.टी. बस हया गावाबाहेरुनच परत जात आहेत . यामुळे शेकडो विदयार्थी , रुग्न , जेष्ठ नागरीक यांना बस प्रवासासाठी गावा बाहेर एक किलो मिटर पाइ चालत जावे लागत आहे . या संदर्भात दिनांक ०२/०६/२०२२ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सेलू यांना निवेदनाद्वारे बालाजी हारकळ रा . वालूर यांनी तक्रार देखील केली होती परंतू पोलिस प्रशासना तर्फे कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे एक दिवसीय अमरण उपोषणाचा  इशारा देण्यात आला आहे. आपणास विनंती करण्यात येत आहे की , आमची मागणी लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावी अन्याथा दिनांक २५/०६/२०२२ रोजी वालूर येथे बसस्थानकात सकाळी ठिक ११:०० वाजता एक दिवसीय अमरण उपोषण करण्यात बालाजी वाल्मिकराव हारकळ,यशवंत चंद्रकांन्त चौधरी रिजवान अन्सारी,ओमकार बाबाराव केशरखाने,राम राघोजी मिसाळ, अॅङ संदिप डाके बालाजी राउत, अंगद मैफड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें