विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिंतूर येथे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 25 जून 2022

विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिंतूर येथे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न.



*मार्च 2022* मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेचा एकूण *निकाल 99.11* आला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतून ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगारी करून यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे सत्कार करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष *मा. काजी आसेफाेद्दीन सिद्दिकी साहेब* होते.


कार्यक्रमाची सुरुवात दहावीच्या विद्यार्थिनी *राबीया शाकेर बेग* यांच्या कूरआन पठणाने करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात *मा. काजी आसेफाेद्दीन सिद्दिकी साहेब* यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद शब्द सुमनाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नंतर शाळेतून विषेश प्रावीण्य सह उत्तीर्ण झालेल्या 26 विद्यार्थ्यांपैकी शाळेतून प्रथम क्रमांक *सना नवाज़ूररहेमान कुरेशी (91.11%) द्वितीय आलीया शेख इमरान लाडले (89.80%) व तृतीय क्रमांक अंशिरा मिर्झा साद बेग आणि उज़मा हफ़ीज़ोद्दीन सिद्दिकी (89.00%)* यांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे पालकांकडूनही सर्व शिक्षकांचे उत्तम कामगिरी केल्याबद्दल हार घालून स्वागत करण्यात आले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख *मेराजोद्दीन सिद्दीकी सर* यांनी तर आभार प्रदर्शन *अहेमद सिद्दिकी सर* यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें