महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने राज्यातील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलु येथील प्रथमिक शिक्षक पठाण जावेद खान फ़ेरोज़ खान यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुणे येथील अंकुशराव लांडगे सभागृहात सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थिती मधे पार पडला.
पठाण जावेद हे यासेर उर्दू प्राथमिक शाळेवर एक उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक म्हणुन ओळखले जातात. विद्यार्थ्यांतील कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात गुणवत्ता विकासाचे नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांच्या याच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे परभणी जिल्हा प्रमुख पठाण रहेमान लालखान, शितल मापारी,संतोष रत्नपारखे यांच्या वतीने निवड करुन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पठाण जावेद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें