रोग म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला.. वालुर ग्रामपंचायतचा अजब कारभार ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 मई 2022

रोग म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला.. वालुर ग्रामपंचायतचा अजब कारभार !



प्रतिनिधी,वालुर(अनवर पठान) दि.29/05/2022

सेलु तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावात मागिल एक महिन्यापासुन वार्ड क्रं.5 मधील उत्तरेकडिल भागातील मुख्य पाणीपुरवठा पाइपलाईन ब्लोक झाल्याने त्या भागात नळाला पाणी येत नसल्याने याच भागातील दक्षिनेकडिल मुख्य वॉल ग्रामपंचायतने बंद करुन उत्तरेकडिल पाणी समस्या सोडविण्याचे नवीन तंत्र अवलंबिले असल्याने मागील एक महिन्यापासुन जेथे समस्या होती ती तर निघाली नाहि परंतु या पुर्ण वार्डातील नागरिकांना ग्रामपंचायतच्या अजब कारभाराने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

    यात विशेष असे कि ज्या भागात मुख्य पाणीपुरवठा पाइपलाईन ब्लोक झाली आहे तेथीलच जनतेला श्रमदानाने पाईप खोदुन जागोजागी पाईप खुले करण्याचे काम करावे लागत आहे व दक्षिण भागात अधीच जेमतेम पिण्या इतके पाणी येत होते ते हि मागील पंधरा दिवसात आले नसल्याने तेथील नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे व ग्रामपंचायतच्या आदेशाने नागरिकांनी मुख्य पाणीपुरवठा वॉल खुला करुन तेथे खड्डा केल्याने रस्त्यावरुन रहदारी करन्यासाठि मोठा अडथळा निर्माण झालेला आहे या सर्व प्रकरणाने ग्रामपंचायतने "रोग म्हशिला अन् इंजेक्शन पखालिला" केल्याची चर्चा सामान्य नागरिकांकडुन केली जात आहे‌‌..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें