जिंतुर प्रतिनिधी
जिंतूर शहरातील मेवाती मोहल्ला येथिल सिराज खान यांच्या 8 वर्षीय सुमैया खानम या चिमुकलीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दि 06/04/2022 बुधवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून आठ वर्षीय सुमैय्या खानम सिराज खान या चिमुकलीने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपल्या आयुष्याचा पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून सुमैय्या खानम यांचे वडील सिराज खान,आजोबा समनदर खान, काका शेरदील खान नजर खान तसेच आजोबा सय्यद अब्दुल खदिर बापू मामा सय्यद वसीम,बापू यानी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें