वालुर येथील स.अलम शहिद दर्गा लगत सा.बां.उपविभाग सेलुचा होणारा अतिक्रमण थांबण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 दिसंबर 2021

वालुर येथील स.अलम शहिद दर्गा लगत सा.बां.उपविभाग सेलुचा होणारा अतिक्रमण थांबण्याची मागणी.



 दि.06/12/2021 तेज़्ज़न्युज़24 संपादक,अनवर पठान.

सार्वजानिक बांधकाम उपविभाग सेलू कडून  वक्फ मालमत्तेत होणारे अतिक्रमण थांबवण्याची मागणी, रस्ते विकास योजना २००१-२१ अनुसार प्र.रा.मा २ ते पाचलेगव,निवळी,वालूर, राजेवाडी ते रा.मा २५३ रस्ता प्र.जि.मा.३० कि.मी.०/०० ते ३०/००याचे काम प्रगती पथावर चालु असुन किमी १५/०० ते ३०/०० ही लांबी सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलू कार्यालयाच्या अखत्यारित येते.या रस्त्यावर वालुर ते सेलु दरम्यान हिंदु मुस्लिमांची आस्था असलेल्या सय्यद अलम शहिद दर्गा जवळुन जात असुन याची रुंदी हि २४ मिटर इतकि  असुन ROW भारतीय रस्ते संहिता प्रमाणे रस्त्याच्या कामात 24 मिटर पैकि रस्त्याच्या मध्यभागापासून एकीकडे १२मीटर व दुसरी कडे १२ मीटर प्रमाणे काम नियमाप्रमाणे अपेक्षित असताना एकीकडे (दर्गाच्या दिशेने) रुंदीकरण हे १२ मीटर पेक्षा जास्त करून दर्गाच्या (वक्फ मालमत्तेत) अतिक्रमण केलं जात आहे. या संबंधी आम्ही या पुर्वी हि तक्रार केलेली असुन उडवा उडवीचे उत्तरे देऊन संबंधित सा.बां.उपविभाग सेलु यांनी दिशाभुल केली असल्याने संबंधीत प्रकरणी दखल घेऊन दखल घेऊन संबंधित रस्ता नियमाप्रमाणे सेंटर पासुन १२मि. एक दिशेला व १२ मि.दुसऱ्या दिशेला करण्यात यावा व वक्फच्या मालमत्तेची होणारी हानि टाळावी ८ दिवसात उचित कार्यवाही न झाल्यास युवा विचार मंच व भाविकांच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे,दि.05/12/2021 रोजी आपले सरकार पोर्टल मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना दिला आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष पठान अनवरखान व प्रदेशाध्यक्ष पठान करिमखान आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें