सेलू( प्रतिनिधी )
येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जनार्धन गोळेगाँवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुलतज्ञ डॉ. अरुण रोडगे यांच्या विशेष प्रयत्नाने हर्णिया, अपेंडिक्स, मुळव्याध या वरील शस्त्रक्रीया कॅम्पचे आयोजन येथील उपजिल्हारुग्णाय येथे करण्यात आले होते. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून परभणीचे शल्य चिकीत्सक डॉ. सुहास खोटे यांनी व त्यांच्या सहकारींनी सदर कँम्पमध्ये एकुन बारा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया केली आहे. ज्यामध्ये हार्णियाचा एक रुग्ण अतिकीचकट व गंभीर स्वरुपाचा होता. या कामी शल्य चिकीत्सक डॉ. सुहास खोटे, भुलतज्ञ डॉ. अरुण रोडगे, आलेश बुरेवार, डॉ. देशमुख यांनी विशेष सहकार्य केले. शस्त्रक्रीयेनंतरची सेवा हे डॉ. आलेश बुरेवार करीत आहेत.
सदरील कॅम्प यशस्वी करण्यासाठी व रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी रुग्ण सेवक अमजद बागवान, शेख साजीद, सचिन गायकवाड, इसाक पटेल, सिद्दिक बागवान, मुशरफ अदिंनी सहकार्य केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें