सेलूत निष्पाप मुलाचा बळी, नगर परिषदेच्या कचरा डेपोत आढळून आला मृत देह - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 5 नवंबर 2021

सेलूत निष्पाप मुलाचा बळी, नगर परिषदेच्या कचरा डेपोत आढळून आला मृत देह


दि.५ नोव्हेंबर २०२१.


सेलू प्रतिनिधी.


आज गूरूवार रोजी दूपारी पाचच्या सूमारास सेलू शहरातील  बिहाणी इडंट्रिज बाजूला असलेल्या कचरा डेपोच्या एका खड्यात रेहान खाँन शेरखाँन पठाण वय वर्ष ९  राहनार राज मोहल्ला या मूलाचा मृत्यदेह दिसून आला.


सेलू शहरातील एका विटभट्टीवर काम करनार्‍या एका गरीब मजूराचा मूलगा काल पासून बेपत्ता असल्या मूळे त्याचा शोध सर्व आजूबाजूच्या लोक घेत होते पण काहीही थांगपत्ता लागत नव्हता आज दूपारी कचरा डेपोत शोधाशोध सूरू केली असता पाण्याने व थर्मा कोलच्या कचर्‍या मूळे काहीच दिसत नव्हते पण बांबूच्या साह्याने  तो मृत्यदेह वरती वरती आला असून विस तासा नंतर या प्रकरनाला पूर्ण विराम लागला पण त्या मूलाच्या पित्याने माझा मूलाचा मूत्यू हा कचरा डेपो मूळच झाल्याचा आक्रोश अनावर झाला, त्या भागातील नागरीकांनी इ.स. २०१२  पासून अनेक वेळा हा कचरा डेपो या जागेवरून हलवावा अशी मागणीचे निवेदन दिले आहे, या कचरा डेपोला संरक्षण भिंत व कसल्याही प्रकारची तार कंपाऊडवाल नाही की साधा  सूरक्षा रक्षक पण  नाही .


 या पूढे तरी एखाद्या निष्पाप मूलांचा बळी जाण्याची वाट कूठ पर्यत पाहनार अशी चर्चा सेलु शहरातील  घिसेखाँ नगर, राज मोहल्ला, सूरज मोहल्ला, पारदी वाडा, येथील नागरीकां कडून होत आहे पूढील कार्यवाही काय होनार कूनाकूनावर गून्हा  दाखल होनार का वेळ काढू धोरण आखनार  या चर्चेला सेलू शहरात ऊधान आले आले .


    पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांची  आक्रोश नागरींकाना योग्य ती कार्यवाही करू असे आस्वासन मयताच्या नातेवाईकांना व त्याच्या सोबत असलेले नागरीकांना दिले या मूळे नागरीकांचा राग शांत होऊन त्या  मूलाचा मृत्यदेह उपजिल्हा रूग्नालयात पूढील कार्यवाही करीता नेण्यात आला .


कर्वव्य दक्ष जिल्हा अधिकारी आचंल गोयल पालिकेच्या  नियम बाहे कचरा डेपोची व घडलेल्या निष्पाप बळी पडलेल्या मूलांच्या परीवाराची दखल घेतील का?  संबंधीतावर कार्यवाही होनार का??

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें