मुज्जु सिद्दीकी उपसंपादक
शहरासह तालुक्यात शैक्षणिक वातावरण निर्माण करून महाविद्यालयीन तरुणांना उच्च शिक्षणासाठी अभ्यासिका, विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके असलेली सुसज्ज वाचनालय उभारण्याची गरज असून या मुळे तरुणांना योग्य शैक्षणीक वातावरण मिळून ते भविष्यात नक्कीच उच्च अधिकारी म्हणून यशस्वी होतील असे प्रतिपादन उप विभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांनी केले
उप विभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त याची अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून बुलडाणा येथे बदली झाल्याबद्दल तालुका व्यापारी महासंघातर्फे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांच्या निवासस्थानी शुक्रवार दि 17 सप्टेंबर रोजी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सखाराम मांडवगळे, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे,स.पो.नि.
मौ अ जलील मिल्ली,प पू महेश चैतन्य महाराज,मंडळ अधिकारी प्रशांत राखे,तलाठी नितीन बुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना दत्त म्हणाले की जिंतूर तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.तरुणांना,विध्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळत नसल्याने बे रोजगार वाढली असून हाताला काम नसल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळत आहे.त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासा साठी दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा,उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक वातावरण निर्माण होणे गरजेचे असून या साठी नागरिकांनी शैक्षणिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे जनतेच्या सहकार्या शिवाय कायदा व सु व्यवस्था ठेवली जात नाही आज पर्यंत जिंतूर वासीयांनी जे प्रेम,सहकार्य आपल्याला दिले तेच प्रेम सहकार्य बदलीवर माझ्या जागी येणाऱ्या अधिकाऱ्यांना ध्यावे अशी अपेक्षा करून आपण जिंतूर वासीयांनि दिलेले प्रेम कधीच विसरू शकत नसल्याचे म्हणाले या वेळी तहसीलदार सखाराम मांडवगळे, रमेश दरगड,ब्रिजगोपाल तोष्णीवाल, महेश महाराज,प्रदीप कोकडवार यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन करून आभार शेख शकील अहमद यांनी मानले या कार्यक्रमाला व्यापारी महासंघाचे गणेश कुऱ्हे,सचिन देवकर, सुनील तोष्णीवाल, सत्यनारायण शर्मा,प्रकाश सोनी,सुदर्शन अच्छा, गजानन दरगड,गजानन चिद्रवार,वसीम बापू,हाजी शे युसूफ,गणेश भाकरे,गणेश डोईफोडे,सुधीर शहाणे,अरून शहाणे,अमोल चवंडके,अविनाश कुलकर्णी, कैलास थिटे,पांडुरंग पल्लेवार,बालाजी सांगळे,अमोल कुऱ्हे,प्रफुल्ल दरगड,गणेश दरगड,संदीप मांदळे पत्रकार राजाभाऊ नगरकर,विनोद पाचपिले,एम एजाज,गुणिरत्न वाकोडे,बालाजी शिंदे,शेख अलीम,रियाज चाऊस,रामप्रसाद कंठाळे, सचिन रायपत्रेवार,मुज्जू सिद्दीकी यांच्या सह अनेक प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी विविध व्यापारी संघटना ,पत्रकारांच्या वतीने श्रवण दत्त यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
मुख्य संपादक अनवर पठान।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें