मुज्जु सिद्दीकी उपसंपादक
जिंतुर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शेख अब्दुल मजिद मोईनोद्दीन यांना यावर्षीचा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या निवडीबद्दल च्या प्रस्तावास मान्यता दिल्या बाबतचे विभागीय आयुक्त कार्यालयाचे पत्र नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. त्या पत्रान्वये आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण कोरोना आजाराच्या मार्गदर्शक तत्वानुसार करावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा क्रमांक 01 (उर्दू) चे प्रभारी मुख्याध्यापक शेख अब्दुल मजीद मोईनोद्दीन यांची शाळेत व परिसरात विद्यार्थी,पालक प्रिय शिक्षक म्हणून ख्याती आहे. तसेच कोरोना काळात लॉक डाऊन मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून अभ्यास गटा द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुभाष आम्ले,शिक्षण विस्तार अधिकारी नवनीत देशमुख,केंद्र प्रमुख एम डी घुगे,अ.मन्नान,खान यूसुफ एजाज,मो यूनुस अंसारी,ढाकने,शेकडे,शालेतील सह शिक्षक मो शहबाज,स.मंजूर कादरी,स.आसिफ,मो जावेद,अ. खलील,स.मुर्तुजा, एम के कादरी,शलाआ व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिराजोद्दीन सिद्दीकी,स.रियाजोद्दीन आदिनी अभिनंदन केले आहे.तालुक्यातील उर्दू माध्यमातील शिक्षकाला तब्बल 33 वर्षा नंतर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तेज़्ज़न्युज़24 मुख्य संपादक अनवर पठान .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें