उलगुलान आंदोलकांचे परभणी जिप कार्यालया समोर आमरण उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 15 सितंबर 2021

उलगुलान आंदोलकांचे परभणी जिप कार्यालया समोर आमरण उपोषण.



उलगुलान आंदोलनाचा चौथा टप्पा


संपादक.अनवर पठान.

जिंतूर तालुक्यातील वीस गावांचा रस्ता आणि पूल प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील उलगुलान आंदोलनकर्त्यांनी आज दि 15 रोज बुधवार पासून परभणी जिप कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 


अधिक माहिती अशी कि, जिंतूर तालुक्यातील वीस गावातील रस्ता आणि पूल बांधकाम प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. रस्ता आणि पूल प्रश्नांचे भांडवल करून गेल्या कित्येक निवडणूकांत नागरिकांची आश्वासनावर बोळवण केली जाते. गावांना मुख्य रस्ताच उपलब्ध नसल्याने आजवर अनेक गरोदर माताची रस्त्यावर प्रसुती झाली आहे.अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण अर्धवट सोडले आहे, आपत्कालीन रूग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहचता येत नाही. पर्यायाने गावांचा विकास खुंटला आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उलगुलान आंदोलनातून काही गावांची रस्ता मंजुरी मिळाली आहे, मात्र आगामी जिप आणि पंस निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडण्याच्या अट्टाहासाने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन यातनांची जाणीव ठेऊन जिंतूर तालुक्यातील वीस गावातील रस्ता आणि पुलांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें