जिंतूर-सेलू तालुक्यातील वीज प्रश्नासाठी मा.ना.प्राजक्त तनपुरे साहेबांची मंत्रालयात बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अगस्त 2021

जिंतूर-सेलू तालुक्यातील वीज प्रश्नासाठी मा.ना.प्राजक्त तनपुरे साहेबांची मंत्रालयात बैठक संपन्न.



जिंतूर :-  जिंतूर-सेलू तालुक्यातील वीज प्रश्नासाठी मा.ना.प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मा.आ.विजय भांबळे सेलू येथील उद्योजग संजय पावडे, नंदकिशोर बाहिती, विजय बिहाणी, निलेश बीनायके, राठी, गोविंद काष्टे इ.उपस्थित होते.  

 या बैठकीमध्ये सेलू तालुक्यातील महत्वाचा विजेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात सेलू शहर, सहरातील व्यापरी व सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी यांना लाईटची वारंवार ट्रीप होणे, लाईट ब्रेक डाऊन होणे, अशा अनेक समस्याना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्यासाठी पाथरीवरून एक स्वतंत्र विद्युत लाईट फिडर मंजूर करण्यात आले आहे.त्याचबरोबर सेलू तालुक्यासाठी १३२ के.व्ही. लवकर मंजुरी देऊन लवकरात लवकर काम मंजूर करून काम पूर्ण करण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सेलू शहरासाठी एक नवीन ३३ के.व्ही.मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मा.ना.प्राजक्त तनपुरे साहेब यांनी दिले आहेत. त्याचबरोबर आडगाव (बा) ता.जिंतूर या ठिकाणी सब स्टेशन ओव्हरलोड झालेले आहे, म्हणून त्या ठिकाणी नवीन तीन चा ट्रान्सफार्मर मंजूर करण्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याला निद्रेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिंतूर शहर, जिंतूर ग्रामीण,सेलू शहर, सेलू ग्रामीण मधील मेंटनंस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें