जिंतुर - येथील न. प. अंतर्गत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मंजूर झालेल्या विकास कामे तात्काळ सुरू करावी असे निवेदन मुख्याधिकारी सतोष लोमटे यांना प्रभागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
प्रभाग नऊ संतोषीमाता मंदिर परिसर, करिमी मसजिद परिसर नूरानी कॉलोनी, सटवाई माता मंदिर परिसर ,मौलाना आझाद कॉलनी, परिसर मधील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकणे व नळाला १० ते २० दिवसाला येत आहे तेव्हा पिण्याचे पाणी रहिवाशी यांना कमतरता होत आहे करिमी मजीद परिसरातील महमूद भाई यांच्या घरापासून गफ्फार भाई यांच्या घरापर्यंतचा मंजूर सीसी रोड तात्काळ करावा गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावरील नाली काम करण्यात आले होते. पण सीसी रोडचे काम हेतुपुरस्कर केले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते टीका खान पठाण, राधेश्याम वैष्णवी, सलीम चाऊस, करीमोद्दीन ,शम्मूभाई कटर,निसार भाई, मेहराज कुरेशी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें