सेलू:- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वच धर्म बांधवांनी तन, मन, धनाने आपले योगदान दिले असून वेळ प्रसंगी प्राणाची आहुती दिली आहे. या स्वातंत्र्य सैनिकांपैकी अनेक स्वातंत्र्य सैनिकांची माहीती आजच्या युवा पिढिला ज्ञातच नाही.
करोडों मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांची माहीती ही शासन दरबारी फायलींमध्ये बंदिस्त झाली असुन अनेक स्वातंत्र्य सैनिकांची माहीती पुस्तक रुपाने उपलब्ध असली तरी मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्या कारणाने ती माहीती समाजाच्या सर्व सामान्य नागरीकांपर्यंत पोहचू शकली नाही. परिणामी मुस्लिम समाज आपल्याच समाजातील स्वातंत्र्य सैनिकांच्या माहीती पासुन अलिप्त आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठि मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची माहीती आजच्या पिढिला व्हावी व त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमी, राष्टनिष्ट्र, राष्ट्रभक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने येथील युथ फोरम तर्फे करोडों मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांपैकी काही निवडक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांच्या सचित्र माहीतीचे प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट रविवार रोजी हुतात्मा स्मारका समोर सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजे पर्यंत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचा लाभ सर्वच समाज बांधव, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत यांनी घ्यावा असे आव्हान नगरसेवक शेख रहीम भाई, शेख आय्युब भाई, आजिम कादरी, शेख महेमुद सर, एड. विष्णु ढोले, युथ फोरमचे शेख साजीद, करीम खान, डॉ. मुताहेर, शेख मुखिद, सिद्दिकी मोईन, अमजत बागवान, शोहेब हाश्मी यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें