शासन व तज्ञांकडून कोविडची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असतांना सेलू न.प. प्रशासन कोविड केअर सेंटर बंद करण्यासाठि दबावतंत्राचा वापर करीत आहे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 जून 2021

शासन व तज्ञांकडून कोविडची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असतांना सेलू न.प. प्रशासन कोविड केअर सेंटर बंद करण्यासाठि दबावतंत्राचा वापर करीत आहे.



    सेलू :- ( प्रतिनिधि ) मागच्या दिड वर्षापासुन कोविड १९ ने राज्यासह देशात धुमाकूळ घातला होता. त्यातल्या त्यात दुसरी लाट आल्यानंतर तर सारी आरोग्य यंत्रना कोळमळुन पडली होती. कोविडच्या रुग्णांना बेड, आँक्सिजन, रेमडिसिविर अदि मिळणे कठिन होऊन बसले होते. दुर्देवाने मृत पावलेल्यांच्या शवांची हेडसाड होतांना संपुर्ण देशाने पाहीले. कुठे अंतिम संस्कारासाठि लांबच लांब रांगा लागले तर कुठे प्रेत नदिंमध्ये तरंगतांना आढळून आले. या भिषण परिस्थितीतून देश सावरत असतांना व सद्या दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतांनाच देशात व राज्यात डेल्टा प्लस चे रुग्ण आढळुन आले आहे. यातच आरोग्य क्षेत्रातील तज्ञ तिसरी लाट ४ ते ६ आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवित आहे. करीता  शासन प्रशासन तयारीला लागलेले आहे. या लाटेचा जास्त परिणाम लहान बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या करीता आरोग्य प्रशासनाच्या वतिने आरोग्य सेवक व इतर कर्मचारींना प्रशिक्षण घाटि रुग्णालय औरंगाबाद येथे देण्यात येत आहे. 

          दुसरी लाट सुरु असतांना सेलू येथे गोरगरीबांच्या सुविधेसाठि अगदिच अल्प मोबदल्यात माशाअल्लाह फंक्शन हॉल येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटर येथे अतापर्यंत पाच व याच माध्यमातून संबधित रुग्णांच्या घरी आठ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सदरील फंक्शन हॉल हा नगर परिषदच्या मालकीचा आहे. सद्या रुग्ण नाही ही सबब पुढे करुन न. प. प्रशासन खाजगी व्यक्तिच्या हितास्तव सदरील कोविड केअर सेंटर बंद करुन हॉल लग्न कार्यासाठि उपलब्ध करुन द्यावा म्हणुन खाजगी व्यक्तिचे काही हितचिंतक सेवाभावनेतून कोविड केअर सेंटर चालविणार्यांवर दाबव टाकत आहेत. तसेच काही नगरसेवक नगराध्यांक्षांवर दाबव टाकून सदरील कोविड केअर सेंटर बंद करुन हॉल रीकामा करण्यासाठि षडयंत्रपुर्वक कार्य करत आहे. 

       या अनुषंगाने नगर परिषद ने सदरील हॉल लग्न कार्यासाठि रिकामा करावे म्हणुन नोटिस बजावली आहे. सद्या मंगल कार्यालयात लग्न करण्याची परवानगी नसतांना, गर्दि करु नये अशा सुचना असतांना व संभावि तिसरी लाट लक्षात घेता कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याची आवश्यकता असतांना सेलू नगरपरिषद गोरगरीबांसाठि सुरू केलेला कोविड केअर सेंटर रीकामा करुन न. प. च्या ताब्यात द्यावा म्हणुन नोटिस बजावली आहे.  एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री तिसरी लाटसाठि आरोग्य यंत्रना व सामाजिक संघटना , सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णांच्या सेवेसाठि सज्ज व तत्पर राहाण्याचे आव्हान करीत असुन सत्ताधारी आमदार सेलू येथिल कोविड केअर सेंटर बंद करावे अशी भुमिका घेत आहेत हे योग्य नसुन सेलूकर व परिसरातील नागरीकांच्या आरोग्यासाठि नुकसानदायक असल्याचे मत एका प्रसिध्दि पत्रकाद्वारे युथ फोरमचे शेख साजीद शेख रहीम , शेख अमजद अ. रशिद बागवान यांनी व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें