जिंतूर / प्रतिनिधी मुज्जु सिद्दीकी
अलहुदा फाउंडेशन महाराष्ट्र च्या कार्यकारणी सदस्यांची एक बैठक रविवार दि 27 जून रोजी दुपारी दोन वाजता फाऊंडेशन चे अध्यक्ष मौ जलील अहमद मिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात फाउंडेशन च्या सचिव पदी शहरातील पत्रकार शेख शकील अहमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तालुक्यातील
मुस्लिम समाजातील सर्व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षित करण्याचे स्वप्न अलहुदा फौंडेशन चे असून या बाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी सर्व सद्सयची बैठक आयोजित करण्यात आली होती यात कोरोना मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अपरिमित हानी होत असून मराठी,इंग्रजी शाळांच्या धर्तीवर शाळा बंद परंतु शिक्षण सुरू याप्रमाणे उर्दू माध्यमातील शाळां मधील विध्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देणे गरजेचे असून त्या बाबत लवकरच योग्य ती पावले उचलली जातील असे मौलाना अ जलील यांनी सांगितले या वेळी पत्रकार शेख शकील अहमद यांची सचिवपदी निवड करण्यात आली या बैठकीला मौलाना शकील हुस्सामी,नगरसेवक शेख सोहेल अहमद,शेख इस्माईल पहेलवान,मिर्झा फारूक बेग,सय्यद इस्माईल हाश्मी,अ रहीम कोककर, मुज्जू सिद्दीकी,अकबर कुरेशी,एड मोहसीन खान,हाफेज युनूस हाश्मी,हाजी एकबाल ,सादेक कुरेशी,अनवर लाला,शेख खिजर उर्फ बाबू राज,सय्यद रियाज, सय्यद वसीम बापू,अमजद खान,मिर्झा तास्किर बेग आदि मान्यवर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें