जिंतुर प्रतिनिधी
जिंतूर शहरातील मेवाती मोहल्ला येथिल सय्यद महेबुब यांच्या सहा वर्षीय नातू सय्यद अदनान अब्दुल मौजुद या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दि १४ एप्रिल बुधवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून सहा वर्षीय सय्यद अदनान अब्दुल मौजुद या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून सय्यद अदनान अब्दुल मौजुद यांचे वसीम बापु, सय्यद मुखबिर, सय्यद तौखिर, सय्यद नसीर पत्रकार यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें