युथ फोरम व जमात ए इस्लामी हिंद ने घडविले माणुसकीचे दर्शन. कोरोना ने दगावलेल्या अजिबाईचे केले अंत्यसंस्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 अप्रैल 2021

युथ फोरम व जमात ए इस्लामी हिंद ने घडविले माणुसकीचे दर्शन. कोरोना ने दगावलेल्या अजिबाईचे केले अंत्यसंस्कार.




सेलू . दि.13/04/2021 :- येथील जवळपास 85 वर्ष वय असलेल्या श्रीमती पार्वतीबाई जैस्वाल यांना दोन दिवसापुर्वि कोरोना झाला होता.  त्यांच्या परिवारातील जवळचे येथे कोणीच नव्हते, त्यांचे नातू अमोल जैस्वाल हे कामासाठि पुण्याला आहेत. उपचारासाठि परभणी जिल्हा रुग्णालय ते माणिक हॉस्पिटल सेलू असा प्रवास करुनही आज श्रीमती पार्वतीबाई जैस्वाल यांचा मृत्यू झाला.  जवळचे नातेवाईक उपलब्ध नाही,  शासकीय यंत्रणेने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला असता,  माणिक हॉस्पिटल सेलू व पुणे स्थित त्यांचे नातू यांच्या समोर अंत्यसंस्काराचा यक्ष प्रश्न निर्माण झाला. अशाप्रसंगी अमोल जैस्वाल यांनी त्यांचे बालपणीचे मित्र सेलूचे रहिवाशी व सद्या धर्माबाद येथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत असलेले शहाब सरांशी संपर्क केला असता त्यांनी ताबडतोब येथील युथ फोरम व जमात ए इस्लामी हिंद युथ विंगला संपर्क करुन संबधित मयत महिले बाबत कल्पना दिली असता, युथ फोरमचे  व जमात ए इस्लामी हिंदचे शेख साजीद, सिद्दिकी मोईन, डॉ. मुताहेर खान, शोहेब हाश्मी, करीम खान, दाऊद खान हे ताबडतोब माणिक हॉस्पिटल येथे दाखल झाले व त्यांनी श्रीमती पार्वतीबाई जैस्वालच्या एका नातेवाईकाला सोबत घेत स्वत: पुर्ण सोपस्कर करुन त्या कोरोनाने मृत्यु झालेल्या महिलेचे अंत्यसंस्कार केले.

        शेख साजीद, सिद्दिकी मोईन, डॉ. मुताहेर, शोहेब हाश्मी, करीम खान, दाऊद खान या युवकांनी माणुसकीचे दर्शन घडलिल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें