जिंतुरचे नगरसेवक कफिल फारुकी यांचे दु:खद निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 मार्च 2021

जिंतुरचे नगरसेवक कफिल फारुकी यांचे दु:खद निधन.

 


प्रतिनिधी.दि.26/03/2021.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा विद्यमान नगराध्यक्षा सबिहा बेगम फारुकी यांचे पती कफिलभाई फारुकी यांचे आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माजलगाव येथे दुःखद निधन झाले, गत आठ दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. एका दिलखुलास आणि लोकप्रिय नेत्याच्या अचानक एक्झिटने संपूर्ण जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.


कफिल फारुकी हे व्यक्तीमत्व अवघ्या परभणी जिल्ह्याला परिचित आहे, वयाच्या 20व्या वर्षी पासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली होती, जवळपास 35 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाने त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक बहिण असा परिवार आहे. आज सायंकाळी साडेनऊ वाजता जामा मस्जिद येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिंतूरकरांनी आज एक प्रदीर्घ अनुभवी आणि दिलदार व्यक्तीमत्व गमावले असल्याच्या भावना स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त होत आहेत.

#जिंतुरचे_नगरसेवक_कफिल_फारुकी_यांचे_दु:खद_निधन.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें