सेलू नगर परिषद मध्ये कायम स्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची नगरसेवकांची जिल्हाधिकारींकडे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 23 मार्च 2021

सेलू नगर परिषद मध्ये कायम स्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची नगरसेवकांची जिल्हाधिकारींकडे मागणी.



सेलू ( प्रतिनिधि ) सेलू नगर परिषदला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील विकास कामांना खिळ बसली असुन, नगर परिषद मध्ये सर्वच बाबींचा खेळखंडोबा होत आहे. परिणामी जनतेची आवश्यक कामे होत नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन सेलू नगर परिषद मध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करावे अशी मागणी नगरसेवक शेख रहीम शेख गुलाम, नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब, नगरसेविका नाहीदा तब्बसुम अजिम कादरी, नगरसेवक शेख कासिम शेख अय्युब, समाजिक कार्यकर्ते अय्युब अमिनोद्दिन, सामाजिक कार्यकर्ते अजिम कादरी यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.  

      निवेदनात म्हटले आहे की, सेलू नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन जयवंत सोववणे यांना ऑगस्ट २०२० पासुन प्रभार सोपवण्यात आला, परंतू ते नगर परिषद सेलू मध्ये फीरकतच नाही. न.प. च्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करत नाही, बैठक अयोजित केली तरी प्रभारी मुख्याधिकारी बैठकीस उपस्थित राहत नाही. महत्वाच्या अर्थसंकल्पिय बैठकीसही ते उपस्थित नव्हते.

        प्रभारी मुख्याधिकारी न.प. कार्यालयात कधिच उपस्थित राहत नसल्यामुळे नागरीकांचे बांधकाम परवानगी, नामांतर सारखे कामे मुळीच होत नाहीत. इतर कामांनाही नागरीकांनी स्वत:चे कामे बुडवून आठ आठ दिवस चकरा माराव्या लागत आहे, तरी त्यांचे कामे होत नाहीत. कार्यालयात कर्मचारी मार्च एंडच्या नावाखाली भेटतच नाही, भेटले तरी सहीचे अधिकारच नाही म्हणुन टोलवा टोलवी करत आहेत.

        तरी आपण सेलू नगर परिषदला येत्या आठ दिवसात कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त करावे नसता न. प. ला कुलूप लावने, धरणे आँदोलन, रस्ता रोको आँदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

         या बाबत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वत: शासनाशी पत्रव्यहार करुन लवकरात लवकर कायम स्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त केल्या जाईल असे तोंडी आश्वासन दिल्याची माहीती निवेदन कर्त्यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें