भाजपाचे चे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर शिवसेनेत दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 9 मार्च 2021

भाजपाचे चे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर शिवसेनेत दाखल.



(वालूर प्रतिनिधी.दि.09/03/2021.)

भारतीय जनता पक्षाचे सेलू

 तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी सोमवारी(दि.8) खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजीत प्रवेश सोहळ्यात भाजपास सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केला. 

सेलू तालुक्यातील वालूर येथील साडेगावकर हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. येथून ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व करीत होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत साडेगावकर यांनी शिवसेनेकडून जिंतूर विधानसभेतून उमेदवारी मागितली होती. परंतू पक्षश्रेष्ठीनी उमेदवारी नाकारल्या नंतर ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. तेथून ते रिंगणात उतरले होते. परंतू साडेगावकर यांचा मोठा पराभव झाला. अलिकडे पर्यंत ते भाजपात सक्रीय होते. तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान त्यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बरोबर तीव्र मतभेद झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर व बोर्डीकर यांच्या कन्येस उमेदवारी बहाल केल्यानंतर ते पक्षात अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचा पुन्हा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला. अन् सोमवारी मुहुर्त साधून ते शिवसेनेत दाखल झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, सखुबाई लटपटे आदीची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें