बेलदार समाजाने संपूर्ण एकजुटतेने डॉ.जुनेद यांच्या सोबत यावे- कलीम बेलदार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 मार्च 2021

बेलदार समाजाने संपूर्ण एकजुटतेने डॉ.जुनेद यांच्या सोबत यावे- कलीम बेलदार.

 


प्रतिनीधी/सेलू ०२ मार्च

सय्यद अहेमद चांद साहब (बेलदार रत्न) यांनी मागील काही काळात मोठ्या हिंमतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्वबळावर बेलदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 'बेलदार समाज सेवा मंडळ' स्थापन केले व पूर्ण आयुष्यात इमान इतबाराने बेलदार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी त्यागले सय्यद अहेमद साहेब काळाच्या पडद्याआड गेले.

परंतु त्यांचे हे कार्य ते गेल्याने ही थांबले नाही त्यांच्या जागी त्यांचा मुलगा डॉ.सय्यद जुनेद निस्वार्थीपणे पुढे नेण्याचे कार्य यशस्वीपणे करत आहे.

अहेमद साहेबांना स्वर्गवास होऊन तीन वर्षे झाली परंतु ते आज ही त्यांनी केलेल्या कार्यामुळे बेलदार समाजाच्या मनात जिवंत आहेत.

परंतु खेदाने म्हणावे लागेल की बेलदार समाजातील काही विघ्नसंतोषी लोक साहेबांच्या कार्याला गालबोट लागेल असे कृत्य करीत आहे. त्यामुळे बेलदार समाजाचे नुकसान होत आहे, करीता बेलदार समाजाने संधीसाधू व स्वार्थी लोकांपासून सावध राहायला पाहिजे खर्याअर्थाने बेलदार समाजाने भक्कम पणे डॉ.सय्यद जुनेद यांच्या निस्वार्थी नेतृत्वाखाली एकजूट होऊन समाज हितासाठी आपले योगदान द्यावे जेणे करून सय्यद अहेमद साहेबांचे 'विकसित बेलदार समाज' पाहण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

असे आवाहन बेलदार समाज सेवा मंडळाचे परभणी जिल्हाअध्यक्ष शेख कलीम बेलदार यांनी बेलदार समाजास केले.

Tezznews24. Chief Editor.Anwar Pathan.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें