विना मास्क फिरणारांविरूध्द कठोर दंडात्मक कारवाई करणार ः जिल्हाधिकारी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 मार्च 2021

विना मास्क फिरणारांविरूध्द कठोर दंडात्मक कारवाई करणार ः जिल्हाधिकारी.



परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास रोख बसावा म्हणून नागरिकांनी उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे असून नागरिक, व्यापार्‍यांनी मास्कचा वापर करावा, अन्यथा संबंधितांना कठोर दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (दि.15) दिला.

संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोना बांधित रुग्ण संख्येत मोठी वाढ आहे. यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मास्कचा वापर करण्याबाबत नागरिक, शहरातील व्यापारी अस्थापनांना वारंवार सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत विनामास्कने नागरिक फिरू लागले आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक, व्यापार्‍यांनी सतत मास्कच वापरावा, विना मास्क असलेल्या ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये, तसेच व्यापार्‍यांनी व तेथील कामगारांनी मास्कचा वापर सातत्याने करावा, मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें