सेलू ( प्रतिनिधि ) करीम खान.
लखनऊ ( उत्तर प्रदेश ) येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी इस्लाम धर्म व कुराण शरीफ मधील आयतांबद्दल चुकीचे वक्तव्य करुन इस्लाम धर्मियांचे धार्मिक भावना दुखावल्यामुळे वसीम रिजवी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन युथ फोरम तर्फे सेलू येथील पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले असुन निवेदनावर करीम खान, सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद, मौलाना कबिर इश्हाती, बेलदार समाजसेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष कलीम बेलदार, मोईन सिद्दिकी, हाजी मोहम्मद हकीम भाई, मुफ्ती अब्दुल अजिज, हाफेज अरबाज सहाब, अतिक हाफेज सहाब, मौलाना इम्रान, शेख अजिम अदिंची स्वाक्षरी आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इस्लाम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ मधिल एकुण २६ आयत वगळण्याची मागणी करणारी जनहित याचिका वसीम रिजवी याने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असुन या बाबतीत प्रसार माध्यमांशी बोलतांना वसीम रिजवी याने इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद सलल्ला हु अलैही व सल्लम व इतर खलिफा यांची शिकवण व कुराण शरीफ मधिल आयतांबद्दल चुकीची व इतर समाजाची दिशाभुल करणारी माहीती दिली असुन यामुळे इतर धर्मिय लोकांमध्ये इस्लाम धर्माबद्दल गैरसमज निर्माण होऊन तेढ निर्माण होऊ शकते . करीता वसीम रिजवी वर भा. दं .सं कलम २९५ व आय. टि. एक्टनुसार गुन्हा दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें