प्रतिनिधी सेलू- दि १२ मार्च २०२१ परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार, रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
पालकमंत्री नवाब मलिक यांचा लॉकडाऊन बाबत एक व्हिडिओ शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावर प्रसारित झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासन लॉकडाऊन बाबत आदेश काढण्याच्या तयारीत होते. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार,दुकाने,आस्थापने बंद राहणार आहेत. शुक्रवार १२ मार्च रोजी रात्री १२ वाजे पासून ते सोमवार १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन राहणार आहे.लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शुक्रवारी प्रसारित झाला. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत शहानिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली. लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकान,भाजीपाला विक्रेते,इतर आस्थापना,व्यवसाय बंद राहणार आहेत. सकाळी ६ ते ९ दरम्यान दूध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें