सेलू येथे पोलिसच उडवत आहे कोरोना नियमांची फज्जा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 फ़रवरी 2021

सेलू येथे पोलिसच उडवत आहे कोरोना नियमांची फज्जा.



प्रतिनिधी सेलू/ दि २६/०२/२०२१

आज सेलू येथे सेलू नगर परिषद व सेलू पोलिसांच्या वतीने विना मास्क व सोशल डिस्टेंसिंग चा उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करत २०० दंड आकारण्यात आला तसेच तुरळक दुचाकी स्वरांना वाहतूक कायद्यांतर्गत दंड आकारण्यात आले.


परंतु पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन मध्ये विना मास्क व सोशल डिस्टेंसिंगची फज्जा उडविताना आढळून आले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांना सेलू येथील सदरील बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांवर  १) साथरोग प्रतिबंध कायदा १९८७ चे कलम २,३ व ४ तसेच २) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करीम खान (सा.भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार तालुका प्रतिनिधी) व पठाण अन्वर खान (पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष) यांनी केली असून मागणीवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. 











कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें