आज तहसील कार्यालय सेलू येथे दबाव गट सेलू वतीने अतीवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आयोजित साखळी उपोषण उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटवार यांच्या लेखी आश्वासनं दिल्यानंतर स्थगित करण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 16 फ़रवरी 2021

आज तहसील कार्यालय सेलू येथे दबाव गट सेलू वतीने अतीवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आयोजित साखळी उपोषण उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटवार यांच्या लेखी आश्वासनं दिल्यानंतर स्थगित करण्यात आले.

Tezznews24(अनवर पठाण).

सेलू तालुक्यातील वालूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर शासनाच्या तांत्रिक अडचणी व गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे अन्याय होत असल्याचे लक्षात येताच दबाव गट सेलू वतीने अनेक निवेदने दिली, रास्ता रोको आंदोलन केले परंतु शासन दरबारी पाठपुरावा करून घेऊ व तुमच्या मागण्या पुढे पाठवू याशिवाय उत्तर मिळत नसल्यामुळे आज दबाव गट व वालूर मंडळातील शेतकरी बांधव यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मदत मिळवण्यासाठी लेखी आश्वासन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु मा संजय कुंडेटवार साहेब निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीने 1 मार्च 2021पर्यंत योग्य ती कार्यवाही करून मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी वालुर महसूल मंडळातील ओमप्रकाश चव्हाळ, दबाव गट प्रमुख ॲड श्रीकांत वाईकर, विठ्ठल काळे साहेब मोरेगाव, महादेव गायके जिल्हा कोषाध्यक्ष परभणी ग्रामीण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, दगडोबा जोगदंड पाटिल  तालुकाध्यक्ष भाजप किसान मोर्चा सेलू, जयसिंग शेळके, नवनाथ डोईफोडे, प्रल्हाद काळदाते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ब्राम्हणगाव पी पी, दत्ता गायके, आबासाहेब भुजबळ, रामप्रसाद डोईफोडे माजी सरपंच ब्राम्हणगाव, किशोरजी जोशी, ॲड खापरखुंटीकर, योगेश काकडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मोरेगाव, एकनाथ सोळंके उपसरपंच सोनवटी, शशिकांत अप्पा चिलवंत, सतीश काकडे सर, भारत इंद्रोके सरपंच काजळी रोहिणा, अब्दुल रौफ वालूरकर, महादेव लोंढे सरपंच मोरेगाव, दिलीप मगर पाटील उपसरपंच मोरेगाव, पांडुरंग सोळंके, सखाराम नाटकर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मोरेगाव, राधाकिसन डोईफोडे, माणिक ढवळे साळेगावकर,  मधुकर नाना सोळंके सरपंच सोनवटी आदीसह असंख्य शेतकरी व दबाव गट सदस्य उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें