जिंतूर तालुकास्तरीय सायक्लोथाॕन स्पर्धा इटोली येथे संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 14 फ़रवरी 2021

जिंतूर तालुकास्तरीय सायक्लोथाॕन स्पर्धा इटोली येथे संपन्न.


प्रतिनिधी,जिंतुर.(मो.एजास)

जिंतूर तालुकास्तरीय शालेय सायकल स्पर्धेचे आयोजन जिंतूर तालुक्यातील इटोली येथे करण्यात आले.या स्पर्धेसाठी माननीय श्री.शिवानंद टाकसाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद परभणी यांनी प्रोत्साहन दिले. तर माननीय डॉक्टर श्रीमती सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांनी ही स्पर्धा संकल्पित केली होती. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य,श्री अविनाश काळे, पंचायत समिती सदस्य श्री. महादु जाधव, - श्री ज्ञानेश्वर घुगे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष - श्री सूर्यकांत घुगे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे - श्री रमेश दरगड उपस्थित होते. ही संकल्पना साकार करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी-श्री सुभाष आमले,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गजानन वाघमारे,श्री.मनोज तोडकर,शिक्षण समिती सदस्य श्री.परमेश्वर मेनकुदळे ,श्री भास्कर चव्हाण,श्री संतोष शिंदे ,श्री.नागेश वाघमारे यांनी नियोजन केले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी लोकसहभागातून विद्यार्थ्यांना टी-शर्ट,टोप्या,मेडल देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या नाश्त्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकसहभागातूनच करण्यात आली.यावेळी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

 अनेक शाळांनी 30-35-40 किलोमीटरवरुन आपले विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी करण्यासाठी ऑटो-जिप- मेटॅडोर-टेम्पो यामध्ये सायकल टाकून आणले. तर दहा ते बारा किलोमिटर वरील शाळांमधील विद्यार्थी सायकल चालवत स्पर्धेस आले.

याप्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा ईटोलीच्या सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन केले. या स्पर्धेत 206 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण माननीय श्री शिवानंद टाकसाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद परभणी मा.श्री.रामाराव उबाळे समाज कल्याण सभापती जि.प.परभणी,मा.सौ.अरुणा अविनाश काळे सदस्य जि.प.परभणी,गटविकास अधिकारी मा.श्री.शिवाजी कांबळे सरपंच सौ.सोनुताई क्ज्ञानेश्वर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. समाज सहभागातून सहकार्य करणाऱ्या समाज प्रेमी नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षकवृंद यांच्यामध्ये असलेला उत्साह पाहून एक आनंदयात्रा सुरू असल्याचा अनुभव येऊन गेला. संपूर्ण कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करून जिल्ह्यातील इतर विद्यार्थी शिक्षकांना देखील पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. ही धुरा टेक्नोसॅव्ही शिक्षक श्री अनिल स्वामी व ग्यानप्रकाश फाउंडेशनचे श्री.संजय बच्छा यांनी पार पाडली. केंद्रप्रमुख श्री क-हाळे यांनी पाच किलोमीटरच्या या सायक्लोथाॕनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चोख काळजी घेतली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें