भोकरदन शहरात अवैध धंद्यांना ऊत .शहरात अवैध मटका व्यवसाय व दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत असल्याने. सगळीकडे मटका, दारूधंदे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 फ़रवरी 2021

भोकरदन शहरात अवैध धंद्यांना ऊत .शहरात अवैध मटका व्यवसाय व दारूधंदा खुलेआम सुरू आहे. पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत असल्याने. सगळीकडे मटका, दारूधंदे.

 


भोकरदन प्रतिनिधी :  शहरासह तालक्यात अवैध मटका व्यवसाय व  दारूधंदा खुलेआम सुरू आहे.पोलीस सोयीस्करपणे काणाडोळा करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सगळीकडे मटका,दारूधंदे बंद आहे; मात्र भोकरदन शहरासह ताुक्यात हे धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.मटका व्यवसाय दारू बंद करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.मात्र छुप्या पद्धतीने अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळाधंदा तालुक्यात जोरात सुरू असल्याने.अनेक देशी दारूविक्रीचा धंदा करणाऱ्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करीत आहे.शहरातपण खुलेआम मटका व्यवसाय व  दारूची विक्री होत आहे.संबधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.शहरातील विविध भागात मटका व्यवसाय चालत असल्याचे सांगितले जातेय. मटक्याचा जुगार खेळणारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे.तसेच,दारू व जुगर मटका यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत,झटपट पैसे कमविण्याच्या हेतून तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक या व्यवसायाकडे वळले आहेत.यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.खुलेआम चालणारा मटका जुगार व्यवसाय व दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे.एकीकडे शासन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते,त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत मात्र सखोल चौकशी होत नाही.त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.तत्काळ चौकशी करून अवैधरीत्या मटका व दारूविक्री व्यवसाय बंद करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें