सेलुतील महावितरणच्या शासकीय कंत्राटदाराच्या हलगर्जी पणामुळे खाजगी मजूर LT पोलवरून पडल्याने प्रकृती चिंताजनक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 दिसंबर 2020

सेलुतील महावितरणच्या शासकीय कंत्राटदाराच्या हलगर्जी पणामुळे खाजगी मजूर LT पोलवरून पडल्याने प्रकृती चिंताजनक.

 


प्रतिनिधी/सेलू दि.17/12/2020.

प्रकरण असे की  भानुदास रावसाहेब कदम रा. सायखेडा ता.जिंतूर हा खाजगी मजूर असून दारिद्री परिस्थिती असल्याने गाव सोडून सेलू येथे रोजमजुरी करून पोट भरण्यासाठी आला असून हाताला लागेल तो काम करून पोट भरतो त्याला आज सकाळी महावितरणचे कंत्राटदार नीरज लोया यांनी रोजमजुरी ने काम लावतो म्हणून त्याला व त्यांच्या सोबतीला अनखिन दोन मज़ुरांना  नेले अशी चर्चा आहे, सेलू येथील सातोना रोडच्या उत्तरेस असलेल्या लोकवस्तीत LT पोलवर तांत्रिक बिघाड झाले असल्याने भानुदास रावसाहेब कदम ह्यास पोल वर चढवले संबंधित गुत्तेदाराने मी स्वतः लाईनमन तेंडुलकर ह्यांच्या कडून लाईट बंदचे परमिट घेतले आहे असे सांगुन त्यास LT पोल वर चढवले परंतु लाईट बंद न झाल्यामुळे विजेचा धक्का लागून सदरील मजूर 4 ते 5 मिनिटं पोलला चिटकून राहिला व नंतर 25 फुटाच्या उंचीवरून जमिनीवर कोसळला असून सदरील व्यक्तीची अवस्था गंभीर आहे.

 शासकीय कंत्राटदार यांच्याकडून अप्रशिक्षित मजूर कामाला लावून  सामान्य मजुरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम महावितरणचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून केले जात आहे.

   त्याच प्रकारे असे हजारो खाजगी व अप्रशिक्षित मजूर तालुक्यात महावितरणच्या शासकीय कंत्राटदारांजवळ काम करीत आहेत वेळीच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अश्या कंत्राटदारांवर अंकुश लावून, अश्या प्रकरणातील कंत्राटदारांचे परवाने रद्द करून भविष्यात खाजगी मजुरांची होणारी जीवित हानी टाळण्यासाठी प्रयत्न करावे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें