येत्या ग्रामपंचायत निवडणुकित जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं.बुथवर महिलांसाठि " पिंक पोलिंग" बुथची सुविधा करा-पठान अनवरखान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 18 दिसंबर 2020

येत्या ग्रामपंचायत निवडणुकित जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं.बुथवर महिलांसाठि " पिंक पोलिंग" बुथची सुविधा करा-पठान अनवरखान.



प्रतिनिधी/सेलु/दि.18/12/2020.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी परभणी जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतीचे निवडणूकिचा दिनांक 15/01/2021 रोजी घेण्याचे जाहिर केले असुन त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीत महिला मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी व महिला सशक्तीकरणाचा एक भाग म्हणुन  महिलांसाठी पिंक पोलिंग बुथची सुविधा करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समिती सेलुतालुकाध्यक्ष पठान अनवरखान दिलावरखान यांनी जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना केली असुन भारताचे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त मा.नसीम झैदि यांनी 2015 बिहार विधानसभा निवडणुकीत पिंक पोलिंग बुथचा प्रयोग केलता याची विशेषतः हे कि या बुथवर पिठासिन अधिकारी ते सर्वच स्टाफ हे महिलाच असल्याने महिला मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी मदत करण्याचे उद्देश होते व त्यानंर पुर्ण देशात विविध राज्यांत यांचा प्रयोग झाला व तो यशस्वी हि झाल्याचे चित्र आहे.

 निवेदनात असे नमुद केले आहे कि,पुर्ण जिल्ह्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकित सर्वच ठिकाणी पिंक पोलिंग बुथची सुविधा करण्याचे प्रयत्न करावे ज़र अपुऱ्या मनुष्यबळ व यंत्रनेने जिल्हाभरात हा प्रयोग होऊ शकत नसेल तर जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील वालुर,गुळखंड.जिंतुर तालुक्यातील बोरी,चारठाणा,कौसडी,कोक.

पाथरी, सोनपेठ, गंगाखेड,पुर्णा,पालम,मानवत तसेच परभणी तालुक्यातील काहि गावाची निवड करुन तेथे पिंक पोलिंग बुथची सुविधा महिला सशक्तीकरण व मदतानांचा टक्का वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याने आज दि.18/12/2020 रोजी उपजिल्हाधिकारी साहेब सेलु मार्फत जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना मागणीचे निवेदन पत्रकार संरक्षण समिती सेलुतालुकाध्यक्ष पठान अनवरखान दिलावरखान यांनी मागणीचे निवेदन दिले असुन निवेदनावर करिम खान रहिम खान पठाण,शेख कलिम शे.युसुफ.समिर खान समशेर खान,ज़ुबेर खान मन्सुर खान पठाण व मरियम खानम अनवर खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें