सेलू ( प्रतिनिधि ) येथिल नागरीवस्तीजवळील असलेला कचरा डेपो इतरत्र स्थलांतरीत करावा तसेच जो पर्यंत कचरा डेपो स्थलांतरीत केला जात नाही तो पर्यंत कीमान कचरा पेटवून देऊ नये अशी मागणी
मुख्यधिकारी, नगरपरिषद सेलू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांनी केली असुन निवेदनाची प्रत उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जमा केलेला दररोजचा संपुर्ण कचरा घंटागाडीद्वारे वालूर नाका- बिहाणी मिल जवळील कचरा डेपोत टाकला जातो. या परिसरात घिस्से खॉ नगर, राजमोहल्ला या भागात अल्पसंख्यांक समाजाची नागरीवस्ती आहे तसेच जवळच अनूसुचित जमातीचे घरेही आहेत. नागरीवस्तीजवळ कचरा टाकल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत असुन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या शिवार सदरील कचरा वारंवार पेटवून दिला जात असल्याकारणाने या नागरीवस्त्यांमध्ये धुरच धुर पसरत असुन परिसरातील नागरीकांना श्वसन रोग होण्याची शक्यता आहे. एकीकडे कोरोना रोगाशी मुकाबला करत असतांना शासन, प्रशासन स्तरावरुन अनेक प्रकारचे उपाययोजना राबवून नागरीकांना नियम व पथ्य पाळण्याचे आव्हान करण्यात येत असतांना सेलू नगर परिषद नागरी वस्तींजवळ कचरा पेटवून देऊन धुर निर्माण करुन श्वसन रोगास निमंत्रण देत आहे.
नागरी वस्तीजवळील कचरा डेपो इतरत्र स्थलांतरीत करण्यात यावा. जो पर्यंत कचरा डेपो स्थलांतरीत होत नाही तो पर्यंत कचरा पेटवून देऊ नये, जर का खाजगी व्यक्ति वा नागरीक कचरा पेटवून देत असतील तर त्यांना प्रतिबंधित करण्यात यावे. या प्रकारामुळे नागरीकांच्या अरोग्यास धोका निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी नसता या कचरा डेपोत लोटांगन आँदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांनी दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें